लांजा ; मोबाईलवर बोलत असताना बिल्डिंगवरुन तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू

0
120
बातम्या शेअर करा

लांजा – सेल्फी काढण्याच्या नादात अनेक दुर्घटना घडल्या आहेत तसेच मोबाइलवर बोलताना भान न राहिल्याने अनेक अपघातही घडले आहेत.

आता मोबाईलवर बोलत असताना बिल्डिंगवरुन तोल जाऊन खाली पडल्याने २१ वर्षीय परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू होण्याची घटना लांजा पानगलेवाडी कोकण पार्क बिल्डींग येथे घडली.लांजा पानगलेवाडी येथील कोकण पार्क बिल्डिंग चे कामावर परप्रांतीय कामगार काम करतात. दिवसभर हे कामगार सेंट्रींगचे काम करतात. त्यानंतर रात्री दहा वाजता एकत्र जेवण करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी २ मे रोजी दहा वाजता अजय राजाराम वर्मा (वय २१ राहणार असोथर, जिल्हा फतेहपुर राज्य उत्तर प्रदेश, सध्या राहणार लांजा पानगलेवाडी) हा आपला मोबाईल घेऊन बोलत बोलत कोकण पार्क बिल्डींगवर गेला होता. मोबाईलवर बोलत असताना त्याचा अचानक तो गेला आणि तो बिल्डिंगवरून खाली पडला. बिल्डिंगवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ अशोक दयाराम वर्मा याने लांजा पोलिसांना दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here