संगमेश्वर – (सत्यवान विचारे )
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांची सासुरवाडी म्हणजे महाराणी येशुबाई यांचे माहेर, म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत प्रचित गडाच्या पायथ्याशी वासलेले शृंगारपूर गाव, ठेकेदाराच्या उदासीनते मुळे गेली तीन वर्ष रस्त्याच्या दुरुस्थीच्या प्रतीक्षेत आहे.
या विषयी सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार नायरी ते शृंगारपूर हा सहा किलोमीटर चा रस्ता गेली अणेक वर्ष अत्यंत खराब झाल्याने वाहन तर सोडाच पण पाई चालनेही कठीण झाले होते, येथील ग्रामस्थ्यांची होणारी हेळसांड ओळखुन अखेर या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन 362,37लक्ष (तीन कोटी बासष्ठ. लाख सदतीस हजार )मंजुर करण्यात आले, त्याच्या रीतसर निविदा निघाल्या, या कामाची निविदा ही सिद्धिविनायक कंट्रक्शन नवी मुंबई या कंपनीने भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले.
या कामाची सुरवात 27/05/2019 करुन ते काम 26/02/2020 ला हे काम पुर्ण करण्याची अंतिम मुदत देऊन कामाचा हमीचा कालावधी हा काम पुर्ण होऊन पुढे पाच वर्षा असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता.मात्र दोन हजार एकोणीसला चालु झालेले काम आज दोन हजार बावीस उजाडले तरी गेल्या तीन वर्षात 40% टक्केही झालेले नाही, एवढेच नाही तर 2022 चा पावसाळा जवळ आला तरीही अदयाप या कामाला सुरवात झालेली नाही. हे काम लवकर पुर्ण व्हावे म्हणुन येथील ग्रामस्थानी अणेक वेळा आंदोलने केली, प्रत्यक वेळी या येथील लोक प्रतिनिधीनी ठेकेदाराला पाठीशी घालत लवकरात लवकर काम पुर्ण करण्याच्या आश्वासना व्यतिरिक्त काहीही केलेले नाही,गत वर्षी आंदोलन झाले त्या वेळी माजी आमदार सुभाष बने ( बने यांचे शृंगारपूर हे आजोळ आहे.)यांनी दोन महिन्यात काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तेही अखेर आश्वासनच ठरेले आहे.
पाऊस दोन महिन्यावर आल्याने जर या रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही तर येथील ग्रामस्थाना पाई चालनेही कठीण होणार आहे.त्यामुळे येत्या आठ दिवसात जर या कामाला सुरवात झाली नाही तर शृंगारपूर, कातूर्डी ग्रामस्थानी कोणतीही पुर्व सुचना न देता देवरुख तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ राजा म्हस्के, विनोद पवार, दीपक म्हस्के, विनोद म्हस्के यांनी दिला आहे.
ज्या गावाचे नाव इतिहासात मोठया अभिमानाने उल्लेख सापडतो, ते गाव स्वराज्याची महाराणी येशूबाई यांचे माहेर शृंगारपूर, येथील ग्रामस्थाना रस्त्यासाठी आंदोलन करावे लागेत असेल तर यासारखी दुसरी प्रशासनाला आणि शासनाला लाजिरवाणी बाब नाही.