मुंबई – विक्रात निधी प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं सोमवारी फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.