खेड ; मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर सहा वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई

0
121
बातम्या शेअर करा

खेड – कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना सहा वर्षासाठी अपात्र करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ ब मधील तरतूदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्यांना नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे.गटनेते प्रज्योत तोडकरी,उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सदस्य नगरसेवक प्रशांत कदम,सुरभी धामणस्कर,रुपाली खेडेकर, ,अल्पिका पाटणे,मनीषा निर्मल,नम्रता वडके,सीमा वंडकर या नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात तक्रार करून चौकशी करून अपात्र करण्याची मागणी केली होती.दरम्यान कलम ५५-१ व ५५ अ व ब मधील तरतूदीनुसार वैभव सदानंद खेडेकर, नगराध्यक्ष, खेड नगरपरिषद, जि. रत्नागिरी यांच्याविरुध्द शासनाकडे दाखल केलेल्या प्रकरणी, मा.मंत्री, नगर विकास विभाग यांच्यासमोर  ११ नोव्हेंबर २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे पार पडलेल्या अंतिम सुनावणीनंतर हे आदेश देण्यात आलेत.याप्रकरणातील वादी प्रतिवादी यांचे मुद्दे त्यासंदर्भातील नियमातील तरतूदी त्याचप्रमाणे प्रतिवादी खेडेकर यांच्यावरील दोषारोपांबाबतचे माझे निष्कर्ष काढण्यात आला आहे. याप्रकरणात खेडेकर यांच्याविरुध्दची सुरु करण्यात आलेली कार्यवाही ही १९६५ च्या अधिनियमातील कलम ५१ अ कलम ५५ अ व कलम ५५ ब नुसार असून ही कारवाई करण्याचा शासनास पूर्ण अधिकार आहेत. याप्रकरणात श्री. खेडेकर यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आलेली आहे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, नियमातील तरतूदी व माझ्यासमोर ठेवण्यात आलेली कागदपत्रे पाहिली असता, खेडेकर यांच्यावरील सर्व दोषारोप सिध्द होतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे असे या आदेशात नमुद करण्यात आलेदरम्यान या सगळ्या प्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की हा निर्णय आपल्याला अपेक्षित होता.या निर्णयाची प्रत मला आज व्हाट्सपवर मिळाली आहे.आपण महाराष्ट्रा बाहेर आहोत. पण,राज्यातील राजकरणाचा दर्जा घसरला आहे आपण शिवसेनेत यावे यासाठी आपण झुकलो नाही म्हणून आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here