बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यभरात गेल्या दोन वर्षापासून कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला आणि याच वेळी या कोरोनामध्ये धावून आली ती गावातील आशा सेविका होय……. तीच आशा स्वयंसेविका जी चा आज आशा दिन म्हणून साजरा होतोय. मात्र आशा म्हणून काम करणाऱ्या या आशा ना खरंच हे काम केल्याने मनाला आशा मिळत आहे. का? ….. त्यांना योग्य मानधन मिळत आहेत का.? असे प्रश्न आहे.

राज्य शासनाने राज्यभरात आरोग्य विभागाच्या आणि ग्रामपंचायतीच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका हे पद निर्माण केले. हे पद ज्यावेळी निर्माण केलं त्यावेळेला आशा स्वयंसेविका म्हणून काम करणारा व्यक्तीला महिना पाचशे रुपये मानधन मिळत होत. त्यानंतर आशा स्वयंसेविका ही हक्काची कामगार कमी मानधनात मिळत असल्याने त्याच आशाला राबवून घेण्याचं काम एक प्रकारे शासन करू लागले. त्यातच दोन वर्षांपूर्वी राज्यात कोरोना महामारी आली आणि त्यावेळेला सगळ्यात जास्त आणि महत्त्वपूर्ण काम केलं ते या आशा स्वयंसेविकाने आपल्या परिवाराची चिंता न करता आपल्या जीवाची चिंता न करता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच निर्भयतेने कोव्हिड काळात कोविड योद्धा म्हणून काम केले. त्यात काही आशा ना आपला जीवही गमवावा लागला.

मात्र असे असले तरी राज्य शासनाने त्यावेळी आशा स्वयंसेविका उत्तम रित्या काम करत असल्याने त्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत कोविड काळात हजार रुपये मानधन हे तेथील ग्रामपंचायतीने द्यावे असे लेखी आदेश काढले. मात्र खरंच त्या अशांना त्या काळात केलेल्या त्या कामाचा मोबदला म्हणून ते हजार रुपये मानधन जे राज्य शासनाने जाहीर केले ते खरोखरच मिळाले का ? …..हा प्रश्न खरं तर अनुत्तरित आहे. कारण राज्य शासनाने हे हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत त्या आशा ला देण्याचा जीआर काढला मात्र अद्यापही अनेक आशा स्वयंसेविका ना ते हजार रुपये तर सोडा साधं ग्रामपंचायतीमार्फत गौरवण्यात ही आलेले नाही. त्यामुळे खरंच याचं वाईट वाटतं की एकीकडे याच आशा स्वयंसेविका यांचा आशा दिन साजरा करण्यासाठी मोठ्या थाटामाटात खर्च करायचा……. मात्र त्याचा आशाना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवायचं….. असा प्रकार घडतोय हेच मात्र दुर्दैव….. कोविड कालावधीत आशा स्वयंसेविका यांना मिळणारे मानधन अद्याप न मिळाल्याने भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. अद्यापही काम केलेले पैसे ग्रामपंचायतीने दिले नसतील तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

राज्यशासन कोविड योद्धा म्हणुन इतर सरकारी कर्मचारी यांना गौरवण्यात व्यस्त आहे. मात्र त्याच वेळी या आशा ना कुठेतरी दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप सुद्धा आशा स्वयंसेविका म्हणून केला जात आहे. तेव्हा या आशा दिनी तरी आशा स्वयंसेविकांना त्यांच्या हक्काचे पैसे जे मिळाले नाही ते पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न केले तरी एक प्रकारे आशा दिन सफल झाल्याचा समाधान वाटेल एकंदरीतच काय आहे तर राज्य शासनाने कमी मानधनात जास्त राबणाऱ्या या आशा स्वयंसेविका ना योग्य तो मानधन आणि योग्य तो मान द्यावा हीच अपेक्षा


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here