बातम्या शेअर करा

खेड – शिमगोत्सवाच्या अखेरच्या पर्वात म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी खेडमध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळाला. मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेडमध्ये रंगपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, व्हेरी गुड.. … व्हेरी गुड… सोमय्या आला का ? अशा आशयाचा घातलेला कुर्ता चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे शहरात रंगाची उधळण आणि राजकीय शिमगा देखील पाहायला मिळाला.

कथित ऑडिओ क्लिपमुळे, शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा व्हेरी गुड… व्हेरी गुड… हा शब्द चर्चेत आला तर त्यांनी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अनिल परब यांच्या रिसॉटची माहिती (रसद ) भाजपचे किरीट सोमय्या यांना पुरवली, असे आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि तत्कालीन खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुराव्यांसह

केला होता. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच घमासान उडाले होते. या घटनेला आता चार ते पाच महिने झाले, मात्र या घटनेची रंगपंचमीच्याच दिवशी पुन्हा उजळणी झालेली पाहायला मिळाली आणि त्याला कारण ठरले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी घातलेला कुर्ता
मनसे नेते वैभव खेडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगपंचमीनिमित्त लहान मुलांना रंगपंचमीसाठी पिचकारी आणि रंग वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी रंगपंचमीदेखील मोठ्या थाटात आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मोठी गर्दी देखील झाली होती. शेकडो लोक आणि तरुण रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच सर्वांच्या नजरा खिळल्या त्या मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी घातलेल्या कुर्त्यावर.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here