आबलोली- (संदेश कदम )- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील भातगाव मधील सर्व महिलांचीएलपीजी पंचायत घेऊन गॅस वापर, अपघात सुरक्षा आणि नोंदणी , बुकिंग या सगळ्या प्रकारची माहिती देऊन महिलांना या महिला दिनाच्या दिवशी संसारातील महत्त्वाच्या गोष्टी वरती चांगल्या बाबी लक्षात आणून दिल्या. या कार्यक्रमामध्ये चंद्रभागा गॅस एजन्सी गुहागर यांचे सर्वेसर्वा संगीता हळदणकर यांनी व त्यांच्या सर्व टीमने सुंदर अशा नियोजनामध्ये मौलिक मार्गदर्शन करुन सर्व उपस्थित महिलांची मने जिंकली
या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच सुशांत मुंडेकर हे होते चंद्रभागा गॅस एजन्सीचे सर्व मेंबर्स यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून नवीन नवीन योजना, पंतप्रधान उज्वला योजना ,गॅस बुकिंग कसा करावा, गॅस कसा वापरावा ,गॅस संपला असता नवीन गॅस लावताना कोणती काळजी घ्यावी, गॅस लिकेज आहे का ? ते कसे तपासावे? गॅस सिलेंडर त्याची वॉरंटी ती कशी तपासावी, तो किती किलोचा आहे.अशा विविध गोष्टी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक रूपात महिलांसमोर पूर्ण सेटप आणून दाखवली अशापद्धतीने एलपीजी पंचायत खूप उत्साहाने आनंदाने पार पडली सामाजिक बांधीलकी जपत संगीता हळदणकर यांनी याच कार्यक्रमांमध्ये महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि हळदीकुंकू मध्ये जवळजवळ ३०० महिला उपस्थित झाल्या या तीनशे महिलांचे हळदी कुंकू करून महिलांना अल्पोपहार सुद्धा देण्यात आला त्यानंतरच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महिलांचे विविध मनोरंजन खेळ आणि या खेळाच्या बक्षिसांचा भार सुद्धा संगीता हळदणकर यांनी उचलला प्रत्येक महिलेला आरतीसाठी ताट बक्षीस रूपाने देण्यात आले .अशी पंधरा बक्षिसे आणि महिलांच्या मनोरंजनात्मक संगित खुर्ची खेळासाठी तीन पैठणी साड्या बक्षीस दिल्या स्वखुशीने महिलांनी महिलांसाठी खेळांमध्ये उस्फुर्त पद्धतीने सहभागी व्हावे. त्या समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना ग्रासलेल्या असतील तर त्यांचे मतपरिवर्तन व्हावं अशा पद्धतीचे विविध प्रकारे मार्गदर्शन करून खऱ्या अर्थानं महिलांनी समोर यायला शिकलं पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन संगिता हळदणकर यांनी केले महिलांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाची सांगता करताना सौ.संगीता हळदणकर यांनी सर्व आयोजक आणि सर्व उपस्थित महिला ग्रामस्थांचे आभार मानले
या कार्यक्रमाला सभापती पूर्वी निमूणकर, स्नेहल बाईत , प्रणाली कांबळे, सरपंच रुक्मिणी सुवरे , सरपंच अर्चना ,ग्रामसेवक एम.एस.गोते, पोलीस पाटील मोहिते, प्रतिष्ठित नागरिक राम मोरे, ग्रामपंचायत सदस्या गायत्री जाधव, स्वरा मुंडेकर, सखाराम पाष्टे, आशा सेविका अनुष्का फावरे, आरोग्य सेवक पाटील तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सूत्रसंचालन चंद्रभागा गॅस एजन्सीचे रहाटे यांनी अलंकारिक भाषेमध्ये केली