हिराभाई बुटाला विचार मंच ; सामाजिक संस्थांना 11 लाखाची आर्थिक मदत करण्याची घोषणा

0
123
बातम्या शेअर करा

खेड – खेड येथील हिराभाई बुटाला विचार मंचतर्फे सामाजिक
संस्थांना आर्थिक मदतीची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदे मध्ये करण्यात आली असून ज्या संस्था पुढाकार घेऊन अनेक विषयांवर लढा देत आहेत अशा संस्थांना तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा मंचचे कौस्तुभ बुटाला यांनी केली

खेड तालुक्यासह शहरी भागात अनेक संघटना , संस्था विविध विषयांवर लढा देत आहेत व त्यांचा सुरू असलेला लढा सर्व सामान्य व्यक्तीशी निगडित आहे मात्र या लढ्याला त्यांना स्वताचा पायावर उभे करण्यासाठी हिराबाई बुटाला विचार मंच आर्थिक
पाठबळ देऊन त्यांचे सबलीकरण करण्याचा मनोदय असल्याचे श्री बुटाला यांनी सांगितले

दरम्यान शहराशी व नागरिकांच्या हितार्थ असलेले अनेक विषय संघटना , संस्था मांडत आहेत मात्र त्यांना आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांचा लढा मर्यादित राहत असल्याने त्यांना सक्षम करण्यासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले या साठी
ज्या संस्थेचा विषय जनहितार्थ असेल अशा संस्थेला ७ ते ८ लाख रुपये , त्या खालो खाल विषय असलेल्या २ संस्थांना प्रत्येकी ५१ हजार , ५ संस्थांना २१ हजार अन्य १० संस्थांना प्रत्येकी ११ हजार तर उभारत्या २० संस्थांना प्रत्येकी ५ हजार देण्यात येणार आहे अशा प्रकारचे स्वरूप असणार आहे आगामी मार्च अखेरीस हा निधी टप्याटप्याने देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आगामी काही दिवसात कमिटीची स्थापना होणार आहे व त्या माध्यमातून विषयानुरूप निधी दिला जाणार असल्याचे बुटाला यांनी सांगितले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here