गुहागर ; वडद येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला जीवदान

0
679
बातम्या शेअर करा


गुहागर- गुहागर तालुक्यातील वडद (बन) येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.

वडद (बन) येथे सोमण यांची विहीर आहे. सुमारे १५ फूट असणाऱ्या या विहिरीला ५ फुटापर्यंत पाणी आहे. गवा रेडा या विहिरीत पडला आणि अडकला. त्याला बाहेर पडता येत नव्हते. याच वेळी तेथील ग्रामस्थ केदार सोमण यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विभागीय वन अधिकारी चिपळूण यांना याबाबत माहिती दिली.

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रानवी वनरक्षक अरविंद मांडवकर, अडूर वनरक्षक संजय दुंडगे, मकरंद बागकर, मुसद्दीक कारभारी यांनी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गवा रेड्याला काढण्यासाठी मोहिम राबविली. गवा रेड्याला विहिरीतून कसे बाहेर काढता येईल, याचा अंदाज घेऊन व कल्पकता वापरून विहिरीला धरुन ५ फूटी खड्डा मारला आणि गव्याला चढता येईल असा रस्ता तयार केला. यानंतर सर्वांनी गव्याला बाहेर काढत त्याची सुटका केली. सदरहू गवा रेडयाची पूर्ण क्षमतेने वाढ झालेली असून एक टनापेक्षा जास्त त्याचे वजन होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here