चिपळूण – मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक घोषित केला ने कोकण रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्याचे वेळापत्रक 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला विस्कळीत झाले आहे. याबाबत कोकण रेल्वेकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
मध्य रेल्वे ने मुंबई विभागात ठाणे ते दिवा या स्थानकादरम्यान 5, 6 आणि 7 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केले आहे. या मेगा ब्लॉकचा कोकण रेल्वे प्रवासावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत जवळपास 20 गाड्या रद्द होणार असून काहींच्या वेळा बदलल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.