मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कृती समितीची बैठक झाली.त्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन करण्यात आलं. पण, आमचे आणि बैठकीचे काहीही देणंघेणं नाही, असं म्हणत कर्मचारी संपावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.
कृती समितीसोबत घेतलेल्या बैठकीसोबत आमचे काहीही देणेघेणे नाही. त्या बैठकीला आमचे वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थित नव्हते. ज्यांना आम्ही संपातून बाहेर काढले त्या रिकाम्या लोकांसोबत सरकारने बैठक घेतली. आम्हाला विलनीकरण हवं आहे बाकी काहीही नको, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.कृती समितीचे सदस्य अजय गुजर यांनी गुणरत्न सदावर्ते यांची वकीली मागे घेतली असल्याची माहिती दिली. त्याबाबत बोलताना कर्मचारी म्हणाले, आम्ही १ लाख कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांना निवड आहे. कृती समितीचे आमची पुढारी म्हणून वागू नये. आमच्या कर्मचाऱ्यांचा जीव गेल्यानंतर यांना बैठक घेण्याची जाग आली का? बैठक घ्यायची असेल तर सदावर्ते यांच्यासोबत घ्या. आमचे मालक फक्त न्यायालय आणि सदावर्ते आहेत, असंही कर्मचारी म्हणाले. तसेच त्यांनी सरकार आमिष दाखवत असल्याचा आरोप केला