गुहागर ; नरवण येथील बगाडा उत्सव संपन्न

0
118
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. बगाडा पाहण्यासाठी तालुकावासीयांसह गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे येथील पर्यटकही ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी आले होते.
कार्तिक महिन्याच्या दर्श अमावस्येला नरवणच्या व्याघ्रांबरी मंदिरात देवदीपावली साजरी होते. यावेळी पाठीत आकडे टोचून तीस फुट उंचीच्या खांबावरुन फेऱ्या मारुन भाविक नवस पूर्ण करतात. लाटेवर स्वार भाविक देवीचा जयघोष करीत, घंटा वाजवत इच्छेनुसार एक, दोन, तीन किंवा पाच फेऱ्या पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण करतात. खाली उतरल्यानंतर आकडे टोचलेल्या ठिकाणी देवीचा अंगारा लावला जातो. यावर्षी ९ जणांनी आकडे टोचून घेतले. सुरुवातीला देवीचा मानाचा आकडा उत्तम नरवणकर यांनी टोचून घेतला. त्यानंतर गुहागरचे हेरंब कानडे यांनी सेवा म्हणून आकडा टोचून घेतला. नरवणचे ग्रामोपाध्याय असलेल्या कानडे घराण्यात गेल्या 35 वर्षात कोणीच आकडा टोचला नव्हता. नयन दहिवलकर व दिपक पाटेकर यांनी आपल्या नवसाची पूर्ती स्वत: आकडा टोचून केली. संतोष धामणस्कर यांच्या नवसपूर्तीसाठी अनिकेत पाटेकर, बाळकृष्ण कोळवणकर यांच्या नवसपूर्तीसाठी धनंजय जाधव, अनिकेत पवार यांच्या नवसपूर्तीसाठी प्रमोद नरवणकर, गुरुदास रोहिलकर यांच्या नवसपूर्तीसाठी संजोग मालप यांनी तर प्रशांत सुर्वे यांच्या नवसपूर्तीसाठी मदन नरवणकर यांनी आकडा टोचून घेतला. मदन नरवणकर गेली ३० वर्षे देवीचा आकडा टोचून घेत आहेत. यापूर्वी त्यांनी आकडा टोचून लाटेवर सर्वाधिक ३२ फेऱ्या मारल्या आहे. यावर्षी त्यांनी १२ फेऱ्या मारल्या.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here