गुहागर – गुहागर तालुक्यातील रिक्त राहिलेल्या १८ ग्रामपंचायतीच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीकरीता दि. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आंबेरे खुर्दमध्ये ३ जागा, शिवणे १, कोतळूक २, जामसुद १, विसापूर १, पांगारीतर्फे हवेली १, वरवेली १, कारूळ १, पाचेरीसडा ६, आबलोली १, पाली २, मढाळ १, भातगाव ३, कोसबीवाडी १, कोळवली १, गोळेवाडी १, पांगारीतर्फे वेळंब १ तर मळण १ या जागांचा सामावेश आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत, ७ डिसेंबर रोजी छाननी, ९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेणे, निवडणूकीसाठी मतदान २१ डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. तर निकाल २२ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.