राजापूर- दळण-वळणाच्या दृष्टीेन उपयुक्त व पर्यायी मार्ग असलेल्या राजापूर विधानसभा मतदार संघातील भांबेड,जि.रत्नागिरी -गावडी,जि.कोल्हापूर व देवडे-भोवडे,जि.रत्नागिरी-विशालगड,जि.कोल्हापूर दोन जिल्हे जोडणारा रस्ता होणे संदर्भात बैठक आयोजित करणेबाबत आमदार डॉ.राजन साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
त्यावेळी आमदार डॉ.राजन साळवी यांनी लांजा तालुक्यातील भांबेड कोळेवाडी ग्रामा ६७ व मौजे मांजरे ते गावडी,जि.कोल्हापूर ग्रामा ४७ या दोन रस्त्यामधील सुमारे ८ कि.मी. अंतर घाट फोडून रस्त्याला जोडल्यास वाहतूकीतील अंतर कमी होऊन दळण वळणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे तसेच संगेमश्वर तालुक्यातील देवडे भोवडे ते विशालगड या मार्गावर नव्याने रस्ता तयार केल्या भविष्यात पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन गैरसोय टाळता येईल असे स्पष्ट केले..
त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.अशोक चव्हाण यांनी सुरु होणा-या हिवाळी अधिवेशना दरम्यान संबंधीत अधिका-यांसमवेत बैठकीचे आयोजन करुन सकारात्मक चर्चा करण्याचे आवश्वासन दिले.