खेड; घरडा केमिकल्स मधील वायुगळती प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
260
बातम्या शेअर करा

खेड -लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्समध्ये झालेल्या वायुगळती प्रकरणी पोलिसांनी अजित जोशी राहणार चिपळूण व विमलेश कामत राहणार घरडा कॉलनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घरडा केमिकल्स कंपनीच्या प्लॉट नंबर पाच मध्ये लोखंडी पाइपमधून द्रवरूप केमिकलच्या काही थेंबाची गळती होऊन येथे खाली लादीवर पडल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूर झाला हा धुर तीव्र असल्याने काम करणाऱ्या अठरा अधिकारी व कर्मचारी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला या कामगारांना तातडीने रतनबाई घरडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले मात्र कंपनीत पदावर काम करणार्या वरील दोन्ही आरोपींनी असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असतानादेखील ती जबाबदारी त्यांनी पार न पाडल्याने कामगारांची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here