गुहागर -पगार वाढीची घोषणा देऊनही एसटी कर्मचारी आपल्या निर्धारापासून मागे हटत नसल्याने अखेरीस आता परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनुसार आता एसटी प्रशासनाने सेवा समाप्तीचा अलटीमेटम दिला आहे.
गेले 3 आठवडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. यावर मार्ग म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली आहे.मात्र विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका अनेक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे अद्यापही बस सेवा सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता एसटी प्रशासनानेही कडक भूमिका घेतली असून येत्या 24 तासात जर कर्मचारी सेवेत हजर झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.