चिपळूण – कोकणातील वन्यप्राण्यांच्या तस्करीचे अनेक प्रकार उघड होत असतानाच आज पुन्हा एकदा अतिशय मौल्यवान अशी व्हेल माशाच्या उलटी ची तस्करी करताना चार जणांना अटक करण्यात वनविभागाला यश आलंय
संगमेश्वर तालुक्यातील शिंदे अंबेरी येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वनविभाग रत्नागिरी व स्थानिक पोलीस विभाग यांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली या मध्ये प्रसाद प्रविण मयेकर, नरेंद्र वसंत खाडे, सत्यभामा राजू पवार, अजय राजेंद्र काणेकर, या चार आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्या कडून व्हेल मासा उल्टी (Ambergris) ६.२ किलो व इटिका कार, जप्त करून घेतली आहे. या सर्व आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांचेकडील प्र.गु.रि. ०२/२०२१ दि. २१/१०/२०२१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अॅम्बरग्रीस असे म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या उल्टीतून सुगंधी द्रव्ये (सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे इ.) करीता मोठया प्रमाणात मागणी असलेने जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला मोठी किंमत मिळते. त्याचा पांदुरका पिवळसर तपकिरी रंग आहे. या दगडासारख्या गोळयाला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतडयामध्ये जातात आणि तेथे अॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामास्कर, मालदीव, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत.
सदरची कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख, स्थानिक पोलीस विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण राजश्री किर, वनपाल सावर्डे, उ. म. आखाडे, वनपाल गुहागर, स.बि. परशेटये, बनपाल खेड, सु. रा. उपरे, सहाय्यक पोलीस फौजदार सावर्डे, प्र.अ. गमरे, म.पो.हे. कॉन्टेबल सावर्डे सु. सं. मोहिते, वनरक्षक कोळकेवाडी, अ. रा. शिंदे, बनरक्षक रामपूर, द. रा. सुर्वे वनरक्षक नांदगाव, रा. प. बंबर्गेकर, वनरक्षक गुढे अ. अ. जाधव वनरक्षक वनउपज तपासणी नाका वि. द. झाडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका कृ. द. इरमले, वनरक्षक रानवी, अरविंद मांडवकर, वनरक्षक काडवली अ.अ. ढाकणे, वनरक्षक अडूर सं. बा. दुंडगे यांनी कार्यवाही पार पाडली.