चिपळूण -चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयानजीकचा गणेशखिंड ते दुर्गेवाडी मार्गावरील पूल मोडकळीस आला आहे. आमदार शेखर निकम यांनी धोकादायक झालेल्या या पुलाची पाहणी केली आणि तातडीने डागडुजी करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तत्काळ काम सुरू झाले. तसेच आमदार निकम यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी बजेटमधून 90 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश काणसे, सावर्डेचे उपसरपंच जमीर मुल्लाजी, बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. राणदिवे, उमेश पवार आदी उपस्थित होते.
हॉटेल समर्थ सावली शेजारी हा पूल आहे. त्या पुलाचे पिलर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे पूल खचला असल्याने तो वाहतुकीस धोकादायक झाला आहे. सावर्डे ग्रामपंचायतीने याची तत्काळ दखल घेत या पुलावरून वाहतूक न करण्याचे आवाहन केले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता आता बंद केला आहे. सध्या या मार्गवरील वाहतूक तरी वालावलकर हॉस्पिटलकडे जाणारा पर्यायी मार्ग कुडप रोड ते हॉस्पिटल किंवा कासारवाडीतून सुरू आहे. आमदार शेखर निकम यांनी नुकतीच या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. आणि तातडीने डागडुजी करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तत्काळ काम सुरू झाले आहे. तसेच आमदार निकम यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी बजेटमधून 90 लाख रुपयाचा आधीच मंजूर झाला आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.