गुहागर – गुहागर तालुक्यातील मुंढर येथे वाघांच्या नखाची तस्करी करताना तिघांना रंगेहात पकडण्यात गुहागर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना यश आले याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके करत आहेत.
गुहागर तालुक्यातील मुंढर येथे वाघाच्या नखांची तस्करी करण्यासाठी इसम येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण रत्नागिरी आणि गुहागर पोलिसांना कळाली होती
त्या ठिकाणी नजर ठेऊन तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले.पोलिसांच्या या कारवाईने कोकणात अजूनही वाघांच्या नखांची तस्करी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत असून कोकणातील तस्करीची पाळेमुळे नष्ट करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या तस्करी मध्ये अजून कोणी इसम आहे का ? याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मुंढर फाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या समोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली बजाज कंपनीची पल्सर दुचाकी क्र. एम. एच. 12 इ. वाय 3232 या गाडीने दिलीप सिताराम चाळके, रा. मुंढर चाळकेवाडी, ता. गुहागर व अक्षय आत्माराम पारधी रा. आमशेत पेवे भोईवाडी ता. गुहागर यांच्याकडे एका पिशवीमध्ये वन्य प्राणी बिबटया व वाघ यांची 14 नखे हाडांच्या मांससह त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना आणि स्वतःचे फायद्याकरीता विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी नखांची तस्करी करणाऱ्या या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, 44, 48,51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री. दीपक कदम करीत आहेत. या कारवाईने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.