चिपळूण – –कोकण पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात प्रथमच अलोरे शिरगाव पोलिस यांना टीडब्लूजे टीमने रॅपलिंगचे प्रशिक्षण दिले त्याचे सर्वत्र कोतुक होत आहे .
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा कुंभार्ली घाट हा घनदाट जंगल व 200 फूट खोल दरीचा आहे. हा घाट नागमोडी वळणाचा असुन या घाटात नेहमीच दुचाकी चारचाकी वाहनाची 24 तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे या घाटात मोठे अपघात घडतात बऱ्याचदा घाटातील खोल दरीत दुचाकी, चारचाकी जाऊन गंभीर अपघात होतो . त्यावेळी जखमीचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात यावेळी शिरगाव पोलिस ग्रामस्थांच्या मदतीने घाटातील दरीत उतरत जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करतात यावेळी त्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले म्हणून शिरगाव पोलीस यांनी प्रथमच या घाटात चिपळूण येथील टीडब्लुजे टीम कडून रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतले. यावेळी प्रथमच अलोरे शिरगाव पोलीस यांनी 200 फूट खोल दरीत रॅपलिंग करण्याचा थरारक अनुभव घेतला अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपलिंगचे पोलिसानी प्रशिक्षण घेतले. कुंभार्ली घाटात भविष्यात एखादी मोठी घटना घडली तर त्यावेळी रॅपलिंगचा उपयोग नक्कीच होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
यावेळी अलोरे शिरगांव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल- भिकाजी लोंढे, दिपक ओतारी व टीडब्लुजे चे कोकण डिव्हिजन प्रमुख संकेश घाग, प्रसन्न करंदीकर टीडब्लुजे ट्रेकिंग टीमचे हेड विशाल साळुंखे, आणि टेकनिकल एक्स्पर्ट देवा घाणेकर, संदीप दळवी.,सुमित मोहिते अमोल नरवणकर साहिल नार्वेकर उपस्थित होते.