गुहागर – विजापूर मार्गावरील देवघर येथे घरात घुसले पाणी…

0
565
बातम्या शेअर करा

गुहागर – (विशेष प्रतिनिधी ) गुहागर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देवघर येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर, 4 जणांच्या घरात पाणी शिरल्याने या नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला असून नुकसान झाले आहे.
गुहागर -चिपळूण मार्गावरील देवघरमध्ये मुसळधार पाऊस. झाला या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याशेजारील घरात पाणी घरांमध्ये घुसले आणि त्यामुळे येथे 4 जणांच्या घरात पाणी जावून नुकसान झाले असुन त्यांची भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

गुहागर -विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग देवघर या गावातुन जातो. त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने रस्त्याशेजारी असणारी जुन्या घरातमध्ये गटाराचे पाणी जाऊन घरांमधील सामानचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुद्धा याच घरांमध्ये या रस्त्याशेजारी असणाऱ्या गटाराच्या पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न केल्याने पाणी घुसले होते. यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवल्याने येथील नागरिकांनी आता जगायचे कसे? असा प्रश्न उभा राहिला याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिपळूण येथील अधिकारी श्री मराठे यांना विचारले असता आम्ही संबंधित ठेकेदाराला तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे त्यामुळे तुम्ही ठेकेदाराकडून काम करून घ्या असा उत्तर आले त्यामुळे या परिसरातील नागरिक संतापले असून वेळीच याची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गुहागर -विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साठत आहे. त्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here