रत्नागिरी – कोकण रेल्वेच्या मार्गावर घसरलेल्या राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला प्रयत्नांना यश आलं असुन सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली आहे.
कोकण रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात हि कामगिरी केली आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी जवळील भोके ते उक्षी दरम्यान मार्गावर बोल्डर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे इंजिन घसरून अपघात झाला होता. कोकण रेल्वे मार्गावरील त्यामुळे सर्व वाहतूक ठप्प होती त्यामुळे विविध स्थानकावर गाड्या थांबून होत्या. घसरलेले इंजिन पुर्ववत करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.आणि त्यांना यश येऊन कोकण रेल्वे अखेर पुन्हा व्यवस्थित सुरु झाली सकाळी झालेल्या या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी रेल्वेसेवा मात्र जवळपास सहा तास ठप्प होती.