गुहागर – गुहागर तालुक्यातील आरे या गावातील दोन तरुण 21 जूनला सायंकाळी मासे गरवायला पाचमाड परिसरातील समुद्रावर गेले होते. हे तरुण आज बुधवार सकाळपर्यंत परत आले नाहीत. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात ग्रामस्थ आणि पोलीस या दोन तरुणांचा शोध घेत आहेत. सिद्धांत साटले रहाणार आरे कलमवाडी आणि प्रतीक नावले रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे आहेत.