चिपळूण ; घरगुती भांडणात सुनेने सासूला ढकलल्याने सासूचा मृत्यू

0
734
बातम्या शेअर करा

चिपळूण -चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा- पाथरवाडी येथे घरगुती भांडणांमधून सुनेने सासूला धक्का दिल्याने सासू बाजूच्या टेबलावर आदळल्याने तिच्या डोक्याला जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला या मृत्युमुखी पडणार्‍या महिलेचे नाव श्रीमती वनिता रामजी जडय़ाळ असे आहे तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सौ मानसी महेंद्र जडय़ाळ हिचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेजारच्या घरात झालेला हा प्रकार पाहण्यासाठी घाईघाईने येणार्‍या मयत हिची जाऊ सौ अनिता अनंत जडयाळ या महिलेचा शेजारच्या घरातील अंगणात पाय घसरून ती तोंडावर उपडी पडल्याने जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला

ताम्हणमळा- पाथरवाडी राहणार्‍या श्रीमती वनिता जडयाळ यांची सौ मानसी महेंद्र जडय़ाळ ही सून आहे पाण्याने भरलेल्या हंड्यात माती टाकल्याच्या कारणावरून त्यांचे मध्ये जोरदार भांडण झाले तेव्हा सुनेने रागाने सासूच्या डोक्यात काठी मारली ही काठी हिसकावून घेण्यासाठी दोघींच्यामध्ये झालेल्या ओढा ओढीत मानसी हिने सासूला धक्का दिला त्यामुळे वनिता या ओटीवर ठेवलेल्या लाकडी टेबलाच्या कोपऱ्यावर जोरात आदळल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान जड्याळ यांच्या घरी झालेल्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारी राहणार्‍या तिची जाऊ सौ अनिता जडयाळ या घाईघाईने शेजारच्या अंगणात येत हाेत्या त्यावेळी त्यांचा पाय घसरला त्यामुळे अनिता या तोंडावर आपटल्या त्यामुळे त्यांच्या छातीला पोटाला मार लागून त्यांचाही मृत्यू झाला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here