आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी

0
56
बातम्या शेअर करा

पंढरपूर – आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here