गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात अनेक कामे ठेकेदाराकडून अपुरी राहिली आहेत. मात्र, याचा नाहक त्रास प्रवासी,वाहनचालकांना होत आहे. शृंगारतळी-पाटपन्हाळे मार्गावर गटार खोदाईचे काम करताना ठेकेदाराने मातीचे ढीग काँक्रीट रस्त्यावर टाकलेले दिसून येतआहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला असून वाहने घसरण्याचे प्रकार सुरु आहेत. ठेकेदाराच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे ही कामे अर्धवटराहिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
रस्ता रुंदीकरणात चिपळूण-गुहागर मार्गावर अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत.पुलांची कामे, त्यांना जोडलेले रस्ते सुस्थितीत नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावरच प्रवासी, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शृंगारतळीत गटारे खोदाईची कामे सुरु आहेत. त्यातील माती काढून रस्त्यावरच ढीग करुन ठेवण्यात आल्याने पावसाने माती काँक्रीटच्या रस्त्यावर येऊन रस्ता निसरडा झाला आहे. शृंगारतळी- पाटपन्हाळे मार्गावरील असलेल्या नाल्यावरील कामहीअर्धवट असून पर्यायी काढलेल्या कच्च्या रस्त्यावरुन अजूनही वाहतूक सुरुआहे. येथे मोठे खड्डे असून पाणी साचल्याने मातीचा चिखल झाला आहे.दुचाकीस्वारांचे येथे लहान-मोठे अपघात होत असून संपूर्ण काँक्रीटचा हा मार्ग धोकादायक बनला आहे. शृंगारतळीतील हेमंत हाँटेलसमोर सध्या गटारे खोदाईचे काम सुरु आहे.त्यातील माती काढून रस्त्यावर ढीग करुन ठेवण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी
गटाराच्या भिंती बांधण्यात आलेल्या आहेत त्यावर काँक्रीट नसल्याने व त्यातील लोखंडी सळ्या बाहेर उघड्यावर असल्याने ही गटारेही धोकादायक बनली आहेत. ज्या पुलांची उभारणी झाली तेथे पक्के काँक्रीटच झालेले नाही.त्यामुळे पुलांना जोडलेल्या रस्त्यांवर वाहने आपटण्याचे प्रकार सुरु आहेत. यावर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.