रोजची धावपळ, मानसिक ताण, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा यामुळे ज्येष्ठांबरोबरच तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढू लागलं आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. पण रोजच्या कामाच्या व्यापात एवढा वेळ कोणाकडेच नसतो. अशा लोकांनी दिवसातून एकदा तीन खजूर खाल्ले तरीही रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवर जेव्हा ताण येतो तेव्हा शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहचण्यासाठी रक्तावर आपोआपच अतिरिक्त दबाव येतो. यालाच उच्च रक्तदाब असं म्हणतात. डोकेदुखी, चक्कर येणं, हृदयाची धडधड वाढणं ही उच्च रक्तदाबाची प्रमुख लक्षणं आहेत. रक्तदाब वाढल्यामुळे हृदय, किडनीवर त्याचा दुष्परिणाम होतो. यामुळे नियमित व्यायाम, चालणे, फिरणे, खाण्यापिण्याचे वेळापत्रक ठरवणे आवश्यक आहे. पण हे करणं सगळ्यांनाच जमेल असं नाही. अशा लोकांनी जर दिवसातून तीन खजूर खाल्ले तरी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, अस तज्ज्ञांच म्हणण आहे.
यासाठी रोज सकाळी नाश्त्याआधी तीन खजूर आवर्जून खावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे. महिनाभर हा उपाय केल्यानंतर हळूहळू रक्तदाब नियंत्रणात आल्याचे जाणवेल. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान, या काळात डॉक्टरांनी दिलेली औषधेही घ्यावीत ती बंद करू नयेत.