गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळून टाकून 82 हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यासाठी दारुनिर्मितीसाठी लागणारे जवळपास 4 हजार लि. रसायन आढळून आले.
वेळणेश्वर येथील जंगलमय भागात हातभट्टी सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानुसार भरारी पथक लांजा, रत्नागिरी यांनी संयुक्तपणे धाड टाकली. दुसऱ्या एका कारवाईत शृंगारतळी ते भातगाव रस्त्यावर देशी-विदेशी मद्याची वाहतूक होणारी असल्याची खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाल्यावर आबलोली येथे सापळा रचला असता देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना कोळवली गुरववाडी येथील वैभव प्रकाश राऊत याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत वाहनासह 37 हजार 600 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वरील कारवाई निरीक्षक शरद जाधव, विक्रम मोरे, उपनिरीक्षक सुनील सावंत, सुधीर भागवत, किरण पाटील, सहाय्यक दु. निरीक्षक विजय हातीसकर, जवान विशाल विचारे, सागर पवार, ओंकार कांबळे, संदीप विटेकर, वैभव सोनावले यांनी केली.
दरम्यान, कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात लाँकडाऊन कालावधीत अवैध्य मद्याची वाहतूक व विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे उप अधिक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी सांगितले.