बातम्या शेअर करा

छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.

अॅसिडिटीचे लक्षणं a
पोटात जळजळ, छातीत जळजळ, मळमळणे, डिस्पेप्सिया, ढेकर येणं, जेवणाची इच्छा न होणं…

पाच फळं खा आणी  अॅसिडिटीपासूनआराम मिळवा

जांभूळ
मधुमेहाच्या उपचारांमध्ये जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांचं फळ असं म्हणूनही ओळखलं जातं. कारण जांभळाचा रस, बी, साल सर्व काही मधुमेहांच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतं. सिझननुसार जांभूळ औषधाच्या रुपात खूप खायला हवं. पोटांच्या रुग्णांना त्यामुळं आराम मिळतो. उपाशी पोटी जांभूळ खाल्ल्यानं गॅस आणि अॅसिडिटीची तक्रार दूर होते.

पेरू
हंगामी फळ पेरू खाल्ल्यानं बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये अनेक गुण असतात जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यात व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात. फायबर असल्यानं बद्धकोष्ठता दूर ठेवते. पेरूमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ खूप प्रमाणात असतं. पेरू नियमित पणे खाल्ल्यानं आपलं सर्दीपासून संरक्षण होतं.

 टोमॅटो
शरीरासाठी टोमॅटो खूप फायदेशीर असतात. यातून अनेक रोगांपासून मुक्तता होते. टोमॅटो शरीरातील विशेष करून किडनीमधून रोगांचे जिवाणू काढून टाकतं. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन-सी असतं. अॅसिडिटीचा त्रास असेल तर टोमॅटो खाणं सुरू करावं, त्रासापासून मुक्तता मिळते. टोमॅटो चवीला आंबट असतं, मात्र ते शरीरातील क्षाराचं प्रमाण वाढवतं म्हणून त्याच्या नियमित सेवनानं अॅसिडिटी होत नाही.

 पपई
पपई खूप गुणकारी असते आणि सहजपणे मिळणारं हे फळ आहे. यातून निघणारा रस आपल्या वजनापेक्षा 100 पट जास्त प्रोटीन पचवू शकतो. त्यामुळं पोट आणि आतड्यांच्या विकारामध्ये खूप फायदा मिळतो. पपई अॅसिडिटी, खोकला, गॅस, बद्धकोष्ठता सारख्या रोगांमध्ये लाभदायक ठरतं.

 संत्र
संत्र्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेलं फ्रॅक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन शरीरात जाताच उर्जा देणं सुरू करतात. संत्र खाणं शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळं उत्साह वाढतो. संत्र नियमितपणे खाल्ल्यानं अॅसिडिटीचा त्रास संपतो.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here