खेड -( प्रसाद गांधी)- खेड तालुक्यातील लोटे पोलिस दूरक्षेत्र हद्दीत शनिवारी दि. २४ रोजी लोटेमाळ परिसरात दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून देशी-विदेशी मद्यसाठा व तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसानी दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश भडवळकर, सूर्यकांत कोटकर व गणेश देवाळे यांना लोटे पोरिस दूरक्षेत्रातील पोलिसानी शनिवारी दि २४ रोजी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी खेड व पोलिस निरीक्षक खेड निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस नाईक चरणसिंग पवार, पोलिस अंमलदार रुपेश जोगी, विनायक येलकर व विशाल धाडवे या पोलिसांच्या पथकाने लोटे परिसरात दोन ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत एकूण १९ हजार २९५ रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे.