खेड -(प्रसाद गांधी) – खेड तालुक्यातील बोरज नळ पाणी योजनेच्या विहिरी जवळनदी पात्रात मासे मृतावस्थेत आढळले असून या प्रकरणी चौकशी करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सुरेंद्र तांबे यांनी ग्रामपंचायत व प्रशासनाकडे केली आहे.
खेड तालुक्यातील बोरज गावातील नळ पाणी योजनेच्या विहिर परिसरातील नदी पात्रात २४ रोजी मृत माशांचा खच आढळला आहे. या बाबत माहिती देताना तांबे म्हणाले की, शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी नळ पाणी योजनेच्या विहिरीजवळ नद पात्रात कोणीतरी रसायन ओतल्याचा संशय आहे. विहिरीतील पाण्याल देखील उग्र वास येत आहे. त्यामुळे पाणी नमुने आरोग्य विभागाकडे तपासून घेणे गरजेचे आहे. न तपासता पाणी सोडले तर ग्रामस्थ व पाळीव जनावरे यांच्या जीवितास धोका पोहचू शकतो. ग्रामपंचायत ग्रामस्वच्छता पाणी समितीने या प्रकाराची तत्काळ नोंद घ्यावी व हा प्रकार करणाऱ्या व्यक्तींचा तपास करुण कायदेशीर कारवाई करावी या मागणीसह हा प्रकार मासेमारी करण्यासाठी रसायनांचा वापर केल्याने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून पाणी योजनेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी करावी, अश मागणी सामाजिक कार्यकर्ते तांबे यांनी केली आहे.