चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे दोन गाड्या जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलीस तपासाअंती एका महिलेने पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे ही महिला व संबंधित गाड्या मालक हे नातेवाईक असल्याचे पुढे येत आहे. उत्तरा शिंदे (५७, मार्गताम्हाणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. अजित वसंत साळवी यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.