भीक मागा, उधार घ्या, पण ऑक्सिजन द्या’; उच्च न्यायालयाने केंद्राला ठणकावले

0
117
बातम्या शेअर करा

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याच्या देशाच्या विविध भागातून आलेल्या तक्रारी त्याचच द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर काल (२१ एप्रिल) नाशिकमधल्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यामुळे काही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी होऊ लागलेली असतानाच या मुद्द्यावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलनं दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्रातील मोदी सरकारला तीव्र शब्दांत उद्विग्न सल्ला दिला आहे. ‘भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या’, असं उच्च न्यायालयाने उद्वेगाने केंद्र सरकारला सुनावले आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here