चिपळूण- चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबनराव यादव यांचे वयाच्या ७१व्या वर्षी कराड येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड गिमेवाडीसह चिपळुणात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत यादव यांच्या आईला काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेजचा अटॅक आल्याने त्यांना कराड येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीमती सुमन यादव यांच्या पश्चात प्रशांत व प्रसाद असे दोन मुलगे व दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.