‘यारों का यार ’ हरपला…….
गिमवी गावातील अतिशय सुस्वभावी , सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा , कष्टकरी कुटुंबातुन येवुन शेतीची आवड जोपासणारा व गिमवी परिसरातील सर्वांचा लाडका तरुण रोहन जोयशी याच्या वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अकाली निधन झाल्याची बातमी समजली आणि पायाखालची वाळू सरकली. इतक्या कमी वयात हसरा चेहरा असलेला खेळकर रोहन आपल्यात नाही हे मनाला समजावुन सांगताना खिन्न वाटले. रोहनच्या आठवणी मनात घेवुन आम्ही त्याच्या घरी सांत्वन करायला गेलो.
रोहन जोयशी म्हणजे ‘ यारों का यार ’ ! जीवाला जीव देणारा कोणतेही काम कुणीही सांगावे त्याला नकार न देता हसत – हसत करणा-या रोहन.
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने गुहागर तालुक्यातील देवघर चिखली सुरळ मुंढर आदी गावातील तरुणांशी त्याची चांगली मैत्री होती. गावातील विवीध सामाजिक उपक्रमात तो सदैव अग्रेसर असल्याने तरुणांसोबतच जेष्ठांशीही त्याची चांगली ओळख होती.लहानथोरांशी अतिशय विनम्रपुर्वक आपुलकीचे वागणे असल्याने समाजातील विविध घटकातील लोकांमध्ये त्याच्याविषयी आदरपुर्वक भावना होती. रोहनच्या याच हरहुन्नरी स्वभावामुळे तो अनेकांना हवाहवासा वाटत होता. एवढ्या कमी वयात त्यांनी जोडलेला मित्र परिवार हा खूप मोठा आहे.
आज आमच्या मध्ये रोहन शरीराने नसला तरी त्याच्या आठवणी मात्र कायम आमच्या मनात तेवत राहतील हे मात्र नक्की. त्याच्या कुटुंबाला रोहन आपल्यात नाही आहे हे दु:ख पचविण्याची ताकद ईश्वर देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना. प्रगती टाइम्सच्या परिवाराकडून ‘ यारों का यार ’ रोहन जोयशी याला भावपुर्ण श्रद्धांजली .