…..आठवणीतला रोहन जोयशी

0
248
बातम्या शेअर करा

अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेला रोहन जोयशी आज आपल्यात नाही हे अजूनही मन मानायला तयार नाही याच रोहनला जाऊन आज तब्बल एक वर्ष झाले 1 वर्षापूर्वी याच दिवशी रोहन आम्हाला अचानक सोडून निघून गेला आजही तो दिवस आठवला की मन एकदम सुन्न होतं कारणही तसेच आहे कारण आमचा रोहन अजूनही आमच्या हृदयात आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता रोहन वय वर्ष 20 कोणतेही काम सांगा कोणतीही कुरकुर न करता किंवा वाद न घालता सगळ्यांच्या मनाला पटेल असे हसत मुखाने काम करणारा असा रोहन , खरंच रोहन गेली वर्षभर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सणाला तुझी आठवण आली नाही असा दिवस गेला नाही ज्या ज्या ठिकाणी तू सहभाग घेतला येथील प्रत्येक क्षण तुझ्या सोबत केलेली धमाल-मस्ती आजही आमच्या स्मरणात आहे. मात्र तू नाहीस हे मन आजही मानायला तयार नाही. 2018 या वर्षीच तू लव मॅरेज करून संसारात गुंतलास आणि तुझा संसार पाच महिन्याचा होण्याच्या आतच तू आम्हाला व तुझ्या संसाराला सोडून निघून गेलास खरंच तुझं वय होतं का ? तू आम्हा सगळ्यांना सोडून गेल्यानंतर आम्ही खूप विचार केला तेव्हा असं कुठेतरी मनाला वाटते की तुझ्या जाण्याचं नक्की कारण काय ? गेले वर्षभर आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतोय मात्र शोध पूर्ण होत नाही.

प्यार इश्क व धोका

एप्रिल 2018 मध्ये तू लव मॅरेज करून सुखी संसारला सुरुवात केली, आम्हाला पहिले वाटलं कि तू लव मॅरेज केल्यामुळे खूप खुश आहेस. मात्र आता ज्या काही गोष्टी घडतात ते आम्ही पाहतोय ते पाहताना तू त्यात खुश नव्हता असंच हे आम्हाला जाणवते मात्र आता खुप उशीर झालाय आता आम्हाला जाणीव होऊन काहीच उपयोग नाही , पण तू जिच्यावर प्रेम केलं होतं आणि जिच्याबरोबर लग्न केलस ती मात्र तुझ्या निघून जाण्यानंतर सहा महिन्याच्या आतच दुसऱ्याबरोबर लग्न करून संसार करायला सुरुवात करते तेव्हाच आम्हाला कळले काहीतरी गडबड होती.ती तुला सहन झाली नाही किंवा ती तू आम्हाला सांगितली नाहीस अस आम्हाला वाटतं त्यामुळे एक मात्र नक्की तुझ्या बाबतीत प्यार इश्क धोका असंच काहीतरी झालंय हे मात्र निश्चित ! परमेश्वर लांब नाहीये ज्यावेळेला परमेश्वराच्या लक्षात येईल त्या वेळेला मात्र कुणालाही माफी नसेल हे मात्र तेवढेच खरे ! रोहन खरोखरच आम्ही अजूनही तुझ्या आठवणीत आहोत हे मात्र नक्की


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here