खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी मधील प्रियांका अनुराग गिरीपुंजे-कांबळे या “मिसेस इंडिया ग्लोबल क्वीन” पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.मुंबई येथे पार पडलेल्या स्पर्धेत देशातील 22 सोंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
प्रियंका या खेडमधील डॉ. मुरलीधर कांबळे यांच्या कन्या आहेत.त्यांचे पहिली ते दहावी पर्यतचे शिक्षण एल पी स्कुल खेड येथे झाले. अकरावी ते बारावी भडगाव येथिल ज्ञानदीप कॉलेज मध्ये झाले. त्यानंतर सांगलीतील वालचंद ऑफ इंजिनिअरिंग येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर मंत्रालयात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक झाली.खेड तालुका रहिवासी मंच या संस्थेच्या वतीने त्यांना मानाचा “खेड रत्न” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.त्यांना मॉडेलिंगची आवड असल्याने त्यांनी सोंदर्यवती स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्या स्पर्धेमध्ये मिसेस इंडिया ग्लोबल क्वीन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.या यशानंतर खेड तालुक्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे .