गुहागर ; पोलिसांची दमदार कामगिरी ,सात लाखाची चोरी करणार चोराला केले अटक

0
779
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना 19 जानेवारी रोजी रात्री घडली होती. या घटनेमध्ये गुहागर पोलिसांनी सांगली येथून रुपकिशोर महतो याला अटक केली आहे. सदर चोरी पगाराचे पैसे न दिल्याने मालकाला अद्दल घडविण्यासाठी महतो बंधुंनी केली होती. चोरीचे पिस्टन कुठही न विकता पुणे येथे त्यांनी लपवून ठेवले होते. असे चौकशीत समोर आले आहे.

आनंद जगदाळे यांनी स्वमालकीचा पोकलेन अवधुत सुशील वेल्हाळ यांच्या निगुंडळ येथील खडी क्रशरवर भाड्याने दिला होता. हा पोकलेन चालविण्याचे काम किशोर महतो करत होता. 19 जानेवारीला किशोर महतो दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ करुन कामगार निवासातून बेपत्ता झाला. 20 जानेवारील (बुधवारी) जगदाळेंनी खडीक्रशरवर जावून पोकलेनची पहाणी केली. तेव्हा कंट्रोल व्हिल आणि स्विंग बेरींग खोलून त्यातील जे.सी.बी. कंपनीचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याचे लक्षात आले होते. या संदर्भात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना जगदाळे यांनी त्यांचा चालक किशोर महतोवर संशय घेतला होता.

यावेळी गुहागर पोलिसांनी तपासाचे पथक तयार केले.तर रुपकिशोर महतो हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे आहे असे समजताच तपासअमंलदार हनुमंत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील आदींनी 5 फेब्रुवारीला इस्लामपूरला जावून रुपकिशोर महतोला अटक केली. 6 फेब्रुवारीला त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी केलेल्या चौकशीमध्ये एक करुण कहाणी पोलीसांसमोर आली. किशोर महतो याला जगदाळे यांनी काही महिन्यांचा पगार दिला नव्हता. त्याचा राग किशोर महतोच्या मनात होता. ही गोष्ट त्याने भावाला सांगितली. आणि मग मालकाला अद्दल घडविण्यासाठी पोकलेनचे पार्ट काढून ठेवण्याचा कट शिजला. त्यामुळे ही चोरी झाली. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार हनुमंत नलावडे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहा.पोलीस निरीक्षक बी.के. जाधव , दीपक कदम, राजू कांबळे ,सचिन पाटील यांनी केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here