चिपळूण – चिपळुण तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून १ लाख ५० हजार ८०० / – रू.मुददेमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचा समावेश आहे. या कारवाईने गावठी दारू धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैदय यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत गेल्या महिन्यात गावठी दारूधंदयासह गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा व मुददेमाल जप्त केला होता यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहीम सुरूच राहील असा इशारा दिला होता. यानुसार ही मोहीम अजूनही सुरूच आहे.
दरम्यान, बोरगाव येथे हातभट्टी सुरू असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथक व चिपळुण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू रसायन व दारूच्या कॅनाने भरलेली तीन चाकी रिक्षा असा मिळुन १ लाख ५० हजार ८०० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय , चिपळुणचे निरीक्षक सुरेश पाटील, भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील , निखिल पाटील , जवान विशाल विचारे , मिलींद माळी , सागर पवार , निनाद सुर्वे , सावळाराम , अतुल वसावे , अर्षद शेख यांनी केली . याप्रकरणी यशवंत हळदणकर व सोमा आग्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचपध्दतीने गोवा बनावट व गावठी दारूधंदयावर कारवाया सुरू राहतील असा इशारा उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांनी दिला आहे .