कर्कश आवाज,धूम स्टाईलने गाडी चालविणाऱ्यांची आता खैर नाही- डीवायएसपी सचिन बारी

0
196
बातम्या शेअर करा


चिपळूण – चिपळूण शहरात सध्या बुलेट आणि अन्य दुचाकी वाहनांमध्ये अनधिकृतरित्या फेरफार करून कानठळ्या बसेल असा कर्कश आवाज,धूमस्टाईल गाडी चालविणे अशा आगाऊ बाईकस्वारांनी नागरिकांना अक्षरशः भयभीत केले आहे,लोकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागत आहे,अशा मोटारसायकल स्वारांविरोधात चिपळूणचे नूतन डीवायएसपी सचिन बारी यांच्या आदेशावर वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह अविनाश विचारे,पो.ह रवींद्र शिंदे,पो.ह अशोक पवार,पो.ह समिधा पांचाळ,पो.ना अभिजीत सकपाळ यांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे,
चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धूम स्टाईल आणि चित्रविचित्र, भयंकर आवाज काढणाऱ्या बाईकवाल्या यमदूतांनी मुलं, स्त्रिया, वृद्ध, रुग्ण अशा सर्वांच्या मनात दहशत उत्पन्न केली आहे.या यमदूतांमध्ये शाळकरी, कॉलेजच्या पोरांचा जास्त भरणा आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा मस्तवाल बाईकस्वारांना पोलिसांनी वठणीवर आणावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पत्रकार मकरंद भागवत यांनी ही सुरवातीपासून अशा आगाऊ चालकांवर कारवाईसाठी मागणी केली होती या मागणीला पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन तसे आश्वासन दिले आहे. मात्र त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या यमदूतांच्या गाड्यांचे नंबर देण्यास नागरिकांनी सहकार्य केले तर अधिक उपयुक्त होईल. ज्यांना स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाची काळजी आहे अशा जागृत नागरिकांनी असे नंबर्स पोलिसांना दिले तर पडताळणी करून कारवाई करणे सोपे जाईल.पोलिसांनीही साध्या वेशातील पोलिसांचे भरारी पथक नेमले तर असे यमदूत लवकर सापडतील अशीही अनेक नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे,बुलेट मोटारसायकल मध्ये मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्या-या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मोहीमेसह विना लायसन्स गाडी चालविणे एका दुचाकीतून तिघेजण प्रवास करणे,नो एन्ट्री मधून गाडी चालविणे या आणि अशा अनेक चुकीच्या गोष्टीमुळे ही मोहीम वाहतूक पोलिसांनी अधिक कडक केली आहे,आतापर्यंत एकूण १० मोटारसायकल स्वारांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या मोटारसायकल मध्ये अनधिकृतपणे बदल करून सायलेन्सर बदलले आहेत त्यांनी तात्काळ मुळ सायलेन्सर बसवून घ्यावेत, अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
चिपळूण शहर आणि परिसरात सध्या धूम स्टाईल आणि चित्रविचित्र, भयंकर आवाजाच्या बाईकस्वारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. ज्यांना आपल्या आणि दुसऱ्याच्या जीवाची काळजी आहे अशा नागरिकांनी वरील बाईकस्वारांची गाडी नंबर, पत्ता जवळच्या पोलीस स्थानकात दयावा आशा अतिउत्साही लोकांनवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून या बेदरकार, बेजबाबदार, मस्तवाल स्वारांमुळे एखादा जीव जाण्यापासून आणि त्यामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे,त्या मुळे प्रत्येकानेच अगदी जबाबदारीने गाडी चालऊन स्वतः सह सर्वांच्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे,


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here