गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी नंतर या तालुक्यात
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमधून तालुक्यावर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आज मतमोजणी झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे. तर तीन ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलच्या आल्या आहेत. गुहागर तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. १६ ग्रामपंचायतींपैकी कुडली, मुंढर, गिमवी, कोंडकारुळ, अडूर, पडवे, खामशेत, मळण, साखरी बुद्रुक,
निगुंडळ, शिर या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर काजुर्ली, तळवली, काताळे, मासु, या ग्रामपंचायतींवर गावपॅनेलचे निर्विवाद विजय मिळवला आहे. ग्रामपंचाय भाजपने ताब्यात ठेवली असून भातगावच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख यांनी २९ ग्रामपंचायतीपैकी २४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात राहील्या असल्याचा दावा केला आहे. तर भाजपने सरपंच उपसरपंच निवडीनंतरच आम्ही आमच्या ग्रामपंचायती किती याचे उत्तर देवू असे सांगितले.