गुहागर -गुहागर तालुक्यातील झोंबडी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक सतीश मुणगेकर यांना आविष्कार फाउंडेशन यांच्या कडून राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असुन 10 जानेवारीला गणपतीपुळे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
झोंबडी केंद्र शाळेचे शिक्षक सतीश मुणगेकर गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थी याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात सतीश मुणगेकर यांचे अनेक शैक्षणिक उपक्रम आणि आधुनिकीकरण करण्याच्या कार्याची दखल कोल्हापूर आविष्कार फाउंडेशनने घेतली असुन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. सतीश मुणगेकर यांनी ई- साहित्य, स्मार्ट PDF, अध्यपनात आधुनिकीकरण आणि इतर नाविन्यपूर्ण लक्षवेधी उपक्रम तयार केले आहेत.