शृंगारतळी; थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला शृंगारतळी बाजारपेठेत रस्ता खोदाई….

0
354
बातम्या शेअर करा


गुुुहागर – डिसेंबर थर्डी फस्टच्या पूर्वसंध्येला शृंगारतळीच्या मुख्य बाजारपेठेत रस्ता रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण रस्ता एका बाजूने उकरण्यात आला असून गुहागर तालुक्यातून खरेदीला येणारे नागरिक, वाहनचालक व गुहागरला जाणारे पर्यटक यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
मोडकाघर ते पाटपन्हाळे दरम्यान, गेले दोन महिने रस्ता रुंदीकरण सुरु आहे. अशा स्थितीत तेथे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेणे गरजेचे असताना ठेकेदाराने तेथील कामाला गती न देता ऐन डिसेंबरच्या अखेरीस शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाला हात घातला. शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. येथे तालुक्यातून अनेक नागरिक खरेदीसाठी येतात. त्यातच 30 डिसेंबरला थर्डी फस्टची खरेदी येथे जोरात सुरु असते. यावेळी थर्टी फस्टला मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आला आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी आदल्या दिवशी बुधवारी दिसून आली. अशा स्थितीत ऐन सकाळच्या वेळेत ठेकेदाराने शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता एका बाजूने उकरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह वाहनचालक, रिक्षा स्टँडवरील चालक, बस थांब्याजवळ असलेले प्रवासी यांची मोठी तारांबळ उडाली. अगोदरच येथे गर्दी असते. तसेच वडापवाले, इतर खासगी वाहनचालक यांची वाहने येथे रस्त्यालगत लावलेली असतात. त्यांना पालपेणे फाट्यावर आपली वाहने लावावी लागली.
विशेष म्हणजे सध्या पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. थर्डी फस्टची मजा लुटण्यासाठी अनेक पर्यटक गुहागरकडे जात आहेत. त्यांना या शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा मोठा त्रास झाला. वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांनाही एसटी बसमधून चढ-उतार करणे कठीण बनले. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here