आबलोली -(संदेश कदम) – महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियान हे अभियान शासना मार्फत खाजगीकरणात जाऊ नये या विरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील महिलांनी गेले दोन दिवस लढा दिला . या लढ्याला रत्नागीरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून विशेष करून गुहागर तालुक्यातील ग्रामिण भागातील ग्रामिण विकास संदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी महिलांच्या उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांच्या (केडर , उमेद कर्मचारी , समूदाय संसाधन व्यक्ती ,) उपस्थितीत सरकार विरोधातील एकजुटीने या लढ्याला यश प्राप्त झाले असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या आंदोलनाची दखल घेऊन उमेद अभियान हे खाजगीकरणाकडे जाणार नाही अशी ग्वाही देऊन पुढिल काही काळामध्ये या बाबतीत शासन निर्णय सुध्दा काढू असे आश्वासन दिल्याने उमेदचे धरणे आंदोलन आंदोलन मागे घेण्यात आले व महिलांनी एकच जल्लोष केला हा महिलांच्या एकजुटीचा विजय आहे. ग्रामिण विकास समदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी , बचत गटाच्या काम करणा-या समूह संघटीका व महिला यांनी ऊभारलेल्या लढ्याकडे लक्ष वेधून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली याची गंभीर दखल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी घेतली त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या मागण्या समजावून घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे , माजी विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांचे सोबत बैठक घेण्याच्या त्वरीत सुचना करून याबाबतीत तात्काळ मंत्रालयात बैठक संपन्न झाली केंद्राच्या सुचने प्रमाणे एका कंपनीला उमेदचे सर्व काम सोपवीले जाणार होते याला उमेदच्या सर्व वरिष्ठ स्तरावरच्या कर्मचा-यांचा , महिलांचा विरोध होता मंत्रालयातील बैठकीमध्ये केंद्राच्या या सूचनेतून कंपनीला वगळण्याचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरविकासमंत्री, उपसभापती विधान परिषद यांच्या सुचने नुसार जाहिर करून उमेदचे खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.