मुंबई – कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा आणि नाणार प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आता आपली भूमिका बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे. जैतापूर येथील 90 टक्के स्थानिकांनी जमिनीचा मोबदला स्वीकारला असल्याने आता प्रकल्पाबाबत भूमिका केंद्र सरकार घेईल असे राजन साळवी म्हणाले आहेत. ते म्हणाले की कोकणात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असून या हाताना काम देण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज आहे. जर स्थानिकांनी मागणी केली तर नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असे मत आ. राजन साळवी यांनी मांडले आहे.