कराड – चिपळूण पोलीस स्थानकात डिवायएसपी म्हणून
कामकाज केलेले व सध्या अँटी करप्शन विभागाचे पुुणे- सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हापोलीसप्रमुख असलेले सुरज गुरव यांना आज भारत सरकारचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार मिळाला.
सुरज गुरव यांना पोलीस खात्यात सात वर्षे पूर्ण झाली आहेत..या काळात त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्हयाची उकल स्वतः केली आहे . त्यापैकी महत्त्वाचे आव्हानात्मक असे अनेक खुनाच्या घटनांचा तपास गुरव यांनी स्वतः जीव लावून शोधून काढून आरोपीच्या मुसक्या आवळून जेल मध्ये टाकले होते.त्यापैकी कोल्हापूर शाहूवाडी येथे डिवायएसपी म्हणून कार्य करताना शित्तूर वारूळ मर्डर केस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती.कारण आरोपीने डोके लावून केलेला मर्डर शोधताना खरोखरच पोलीसी कसब पणाला लावून त्यांनी हा मर्डर उघडकीस आणला होता. याबाबत या पुर्वीच पोलीस महासंचालक यांचे २०१७ चे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड प्राप्त झाले होते.आज याच गुन्हयांच्या कामगिरीसाठी गृहमंत्री भारत सरकार यांचे बेस्ट डिटेक्शन पदक प्राप्त झाले होते.हे पदक त्यांना आज गुरुवार दिनांक १० डिसेंबर रोजी प्राप्त झाले . यापूर्वी २०१८ साली डिवायएसपी असताना तामगाव मोरवाडी दुहेरी खून प्रकरण या आव्हानात्मक गुन्हयासाठी पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड आणि २०१९ ला चिपळूण येथील बहुचर्चित रामदास सांवत मर्डर केससाठी पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड प्राप्त झाले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल सूरज गुरव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/12/IMG-20201210-WA0057-669x1024.jpg)