गुहागर ; शासनाला खोटी माहिती पुरवून संपत्ती बळकावली, महसूल विभागाकडे तक्रार दाखल

0
1126
बातम्या शेअर करा

गुहागर – स्वतःच्या आईला १० वर्ष अगोदरच मृत दाखवून तसेच चार बहिणी असताना देखील वारस तपासात बहीण नसल्याची माहिती देत वडिलांची मिळकत आपल्या व दोन भावांच्या नावे करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण येथील मुश्ताक इब्राहिम बोट यांनी गुहागर तहसीलदार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

गुहागर तालुक्यातील सुरळ येथील इब्राहिम अब्बास बोट यांचे दोन भाऊ आणि चार बहिणी आहेत.त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा १०ऑगस्ट २००३ मध्ये झाला त्यावेळी त्यांनी वारस तपाससाठी महसूल विभागाकडे अर्ज दाखल केला.वारस तपासाच्या वेळी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची दिशाभूल करून चक्क खोटी माहिती पुरवली.स्वतःची आई जिवंत असताना त्यांनी चक्क मृत असल्याची माहिती दिली.प्रत्यक्षात त्यांच्या आईचा मृत्यू हा ४ मे २०१३ रोजी झाला आहे.मात्र २००३ मध्ये वारस तपासाच्यायावेळी आई मयत असल्याचे दाखवून तशी नोंद देखील कागदपत्रांवर करून घेतली.असा गंभीर आरोप मुश्ताक बोट यांनी अर्जात केला आहे. तसेच चार बहिणी असताना आणि त्या जिवंत असताना बहिणी नाहीत अशी खोटी माहिती संबंधित महसूल अधिकाऱ्यांना देऊन त्या चार ही बहिणींचा हक्क मिळकतीतून काढून टाकला.महसूल ७/१२ तसेच अन्य कागद पत्रांमध्ये बहिणीच्या नावाची कुठेही नोंद नाही.आशा प्रकारे त्यांनी शासनाची फसवणूक केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुश्ताक बोट यांनी गुहागर तहसीलदाराकडे ही तक्रार करत केली आहे.तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देखील केली आहे.तसेच या अर्जाच्या प्रति त्यांनी प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी ,यांना दिल्या आहेत.

या बोगस प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून महसूल विभागातील तलाठी ,अधिकारी त्यांनी कोणतीही शहानिशा न करता अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचे उघड होत आहे. परिणामी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता बोट यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here