शुंगारतळी- (मंगेश तावडे )- गुहागर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशी शृंगारतळी बाजारपेठ या बाजारपेठेत असणाऱ्या एका बँकेसमोर रस्त्याच्या अगदी शेजारी बिल्डरच्या फायद्यासाठी महावितरणने डीपी उभारण्यास परवानगी दिली काय ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शृंगारतळी ओळखली जाते. मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ही बाजारपेठ दिवसेंदिवस मोठी होताना दिसत आहे मात्र हे होत असल तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच हे बिल्डर आपल्या बिल्डिंगचे बांधकाम करताना मात्र सर्वसामान्यांना अडचण कशी निर्माण होईल असं पाहून एकीकडे बांधकाम तर करताय. आता मात्र सर्वसामान्यांच्या जीवाला धोका होईल अशी लाईटची डीपी व ट्रान्सफॉर्मर रस्त्यापासून सुरक्षित अंतर न सोडता ग्राहकांची वर्दळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टाकून एक प्रकारे ग्राहकांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम हा बिल्डर करतोय शुंगारतळी येथील बँक ऑफ इंडियाच्या समोरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या अगदी शेजारी एका बिल्डरने आपल्या इमारतीसाठी लागणारा इलेक्ट्रिक सप्लाय ट्रांसफार्मर आणि डीपी रस्त्याच्या अगदी शेजारीच उभी केली त्यामुळे या ठिकाणी भविष्यात धोका निर्माण होऊन एखाद्या नागरिकाचा जीव वगैरे गेला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय गुहागर -विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम एकीकडे सुरू असताना रुंदीकरणाचे निकष बाजूला ठेवून रस्त्याच्या अगदी कडेला डीपी उभारण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली? याबाबत सध्या शृंगारतळी बाजारपेठेत चर्चेला ऊत आलाय. बिल्डरच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बिल्डरचा आणि महावितरणच्या या अजब कारभाराबाबत बाबत सध्या सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
ज्या ठिकाणी ही डीपी व ट्रान्सफॉर्मर उभा करण्यात आला आहे त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. आणि रस्त्याच्या कडेला नेहमी असणारी वर्दळ आहे. याबाबत येथील व्यापारी व शेजारी असणाऱ्या जमीन मालकाने महावितरणकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही महावितरण’ने याबाबत कोणतीच दखल घेतल्याने काहीतरी साटेलोटे झाल्याची चर्चा सध्या शृंगारतळी सुरू आहे. तरी महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न करणारे ट्रांसफार्मर आणि डीपी त्वरित या ठिकाणा वरून हलवावी अशी मागणी आता जोर धरत आहे.