बातम्या शेअर करा

गुहागर -भारतीय जनता पार्टी गुहागर ओबीसी तालुका अध्यक्ष व सुरळ गावचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी बुधकमेटी व मित्रपरिवार सुरळ यांच्या वतीने कोरोना संक्रमण काळात तसेच अन्य वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणारे सुरळचे डॉक्टर दर्यावर्दी , अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सौरवी आग्रे ,जान्हवी पालटे , सुलोचना मोहिते ,नसीमा पालटे , मिलन मोहिते , अंकिता मोहिते कोरोना संक्रमणात रेशन पुरवणारे मजीद केळकर दूध भाजी पुरवणारे मुजीब केळकर वाहनांची सुविधा उपलब्ध करणारे मनोहर चव्हाण ,विनायक चव्हाण ,सतीश ठाकूर ,राजदत्त बागकर औषध पुरवणारे प्रथमेश चव्हाण , किराणा साहित्य पुरवणारे मजीद बोट तसेच कोरोना संक्रमणात आपली प्रमुख भूमिका बजावणारे ग्रामपंचायत सुरळ व भारतीय सिमेवरती आपले रक्षण करणारे फौजी विशाल चव्हाण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सूर्वे , सरचिटणीस सचिन ओक,ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर , मधुकर असगोलाकर , व जिल्हा सरचिटणीस मंगेश जोशी , कारुळचे उपसरपंच मोहित , वड़द ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मुरमुरे,संदीप धनावड़े , निवारा ट्रेडर्स चे मालक भालचंद्र जोगले , विद्याधर बागकर मढाळ पाली सोसायटीचे चेअरमन रवींद्र आग्रे ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण उद्योजक जगन्नाथ बागकर उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here