मुंबई – कोकण रेल्वे मार्गावर २१ ऑक्टोबरपासून वास्को द गामा ते पटना ही पूर्णतः आरक्षित असलेली सुपर फास्ट फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. या स्पेशल ट्रेनचे पावसाळी, बिगर पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
२१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दर बुधवारी वास्को द गामा येथून सायंकाळी ६ वाजता सुटणारी स्पेशल ट्रेन तिसर्या दिवशी दुपारी १२.१० वा. पटना येथे पोहोचेल. दर शनिवारी पटना येथून दु. २ वा. सुटणारी स्पेशल ट्रेन तिसर्या दिवशी सकाळी १० वा. वास्को द गामा येथे पोहोचेल.
बिगर पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानुसार ४ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी वास्को द गामा येथून सायंकाळी ७ वा. सुटणारी स्पेशल ट्रेन तिसर्या दिवशी दुपारी १२.१० वा. पटना येथे पोहोचेल. ७ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी पटना येथून दु. २ वा. सुटणारी स्पेशल ट्रेन तिसर्या दिवशी सकाळी ९ वा. वास्को द गामा येथे पोहोचणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव, थिविम, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल येथे स्पेशल ट्रेन थांबणार आहे. २१ डब्यांची स्पेशल ट्रेन नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर, मास्क वापराच्या नियमांची अंमलबजावणी कोकण रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे. या नियमांची माहिती सर्व प्रवाशांना देण्यात आली आहे.